‘त्या’ मृत शाळकरी मुलींच्या कुटुंबियांना केली स्वपदरची आर्थिक मदत
सिल्लोड । वार्ताहर
गेल्या दोन दिवसांपूर्वी तळेगाव वाडी ता. भोकरदन येथे खेळत असतांना पाच शाळकरी मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आज तळेगाव वाडी येथे सांत्वन भेट दिली. घडलेली घटना अत्यंत हृदयस्पर्शी असून मृतांच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळेल अशी ग्वाही देत ना.अब्दुल सत्तार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 हजार या प्रमाणे एक लाखाची स्वपदरची मदत दिली.
यावेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, युवानेते अब्दुल समीर, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, शिवसेना जालना उपजिल्हा प्रमुख मनिष श्रीवास्तव, भोकरदन शिवसेना तालुका प्रमुख मनोज पुरोहित, भोकरदन चे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, फुलंब्री तहसीलदार श्री देशमुख, गटविकास अधिकारी औरंगाबाद अशोक दांडगे, गटविकास अधिकारी भोकरदन धर्मनाथ काकडे, शिक्षण अधिकारी एस.पी. जैस्वाल, तळेगाव सरपंच रुउफ पठाण आदींची उपस्थिती होती. तळेगाव वाडी येथील तलावात एकाच वस्तीतील पठाण सादिया अस्लम, पठाण अल्फीजा गोसय्या, पठाण नजराणा नवाजखा, पठाण अरशीन लतीफ, पठाण सबिया अस्लम या 5 शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू होणे ही मोठी दुःखद घटना आहे. 25 वर्षात पहिल्यादाच या तलावात जीवित हानी झाली असल्याचे यावेळी गावकर्यांनी सांगितले. घडलेली घटना अत्यंत दुःखद असून शासनाच्या वतीने तसेच जिल्हा परिषद औरंगाबाद च्या वतीने खास बाब म्हणून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल असे ना. अब्दुल सत्तार या प्रसंगी म्हणले. तर तळेगाव ते तळेगाव वाडी रस्ता बांधकाम, गावातील अंतर्गत रस्तासाठी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचा सूचना ना.अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या.
Leave a comment