पो.स्टे सिल्लोड ग्रामीण पोलीसांची कारवाई

भराड़ी । वार्ताहर

सध्या चालु असलेल्या कोरोना संदर्भान आमठाणा दुरक्षेत्राचे बीट अंमलदार पो.ह. देवीदास जाधव , पो.ना. सचिन सोनार , काकासाहेब सोनवणे असे स.पो.नि. श्री किरण बिडवे यांच्या आदेशाने आमठाणा दुरक्षेत्र हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना, चारनेर शिवारातील शेलगांव रोडवर थडगा पुलावर असताना , तिथे एक अशोक लिलेन्ड कंपनीचा छोटा हत्ती गाडी क्रमांक एमएच 20 सी.डी. 4216 हि उभी दिसुन आली. त्यामध्ये दोन फिक्कट लाल रंगाचे (नागोरी जातीचे) बैलं संशयीतरित्या दिसुन आल्याने , सदर वाहनाजवळ उभा असलेला इसमास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव शहारुख अक्त्तर शहा वय 22 वर्षे रा . हर्सल , औरंगाबाद असे सांगितले . त्यास वाहनामधील बैलाबाबत वाहतुक व इतर दाखले बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले . त्यामुळे त्यास विश्वासात घेऊन पुन्हा विचारपुस केली असता त्याने सांगितले की , मी, माझे साथीदार (1) सिरराजखॉन अब्दुलखॉन व त्याचा भाऊ (2) रईस अब्दुलखॉन दोन्ही रा . हर्सल औरंगाबाद अशांनी नमुद वाहनातील शेतकयाचे बैलं पाचोरा ते पहुर जाणारे रोडवरील गोराखेडा ता . पाचोरा जि . जळगांव येथुन चोरी करुन , औरंगाबाद कडे घेऊन जात होता पण अचानक वाहन बंद झाल्याने , येथे थांबलो आहे पण पोलीस गाडी आल्यामुळे माझ्या सोबतचे वरील दोन्ही येथुन पळुन गेलेले आहे असे सांगितल्याने , सदरचे वाहन, बैलं व वाहनांजवळ उभा असलेला शहारुख अक्त्तर शहा यास ताब्यात घेऊन , पो.स्टे.ला आणण्यात आले होते.

वरील हकीकत वरुन तात्काळ पो.स्टे . पाचोरा जि . जळगांव येथे संपर्क केला असता , वर नमुद घटनेतील चोरीस गेलेले बैलां संदर्भाने तक्रारदार नवल संतोष पाटील रा . गोराखेडा शिवार ता . पाचोरा जि . जळगांव यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पो.स्टे . पाचोरा जि . जळगांव येथे गुरनं । 240/2020 कलम 457 , 380 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . वर नमुद घटनेतील चोरीस गेलेले बैलं हे पो.स्टे . पाचोरा जि . जळगांव येथील पोलीस नाईक वसंत पाटील व सुरखडे यांच्या ताब्यात देऊन , शेतकरी राजांचे चोरीस गेलेले बैलं परत करण्यात आलेले आहेत . सदरची कारवाई मा . पोलीस अधिक्षक  मोक्षदा पाटील  , मा . अपर पोलीस अधिक्षक  गणेश गांवडे , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. ,  किरण बिडवे , आमठाणा दुरक्षेत्राचे बीट अंमलदार देवीदास जाधव , सचिन सोनार , काकासाहेब सोनवणे , विलास सोनवणे , दिपक इंगळे यांनी केलेली असुन , घाटनांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिक मोरे , पोलीस पाटील  नसीर तडवी यांनी मोलाचे सहकार्य केले .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.