खुलताबाद । वार्ताहर
खुलताबाद येथे मंगळवारी एका 58 वर्षीय पुरुषाचा अवहाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आझमशाहीपूरा येथील 58 वर्षीय व्यक्तीला गेल्या काही दिवसांपासून ताप,सर्दी,आणि खोकल्याचा त्रास होता.म्हणून सदर रुग्णाचा एका स्थानिक रुग्णालयात उपचार घेत होता.मात्र परिस्थिति योग्य न झाल्याने सोमवारी त्यांना औरंगाबाद घाटित दाखल करण्यात आले होते. आरोग्य चाचणी झाल्यावर मंगळवारी त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय खुलताबाद डॉ.सुहास जगताप म्हणाले की, संक्रमित रुग्णाचा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता.याप्रसंगी खबरदारी म्हणून त्या खाजगी रुग्णालयाला देखील सील करण्यात आला आहे.
यावेळेस खुलताबाद तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, वैदकीय अधिकारी सुहास जगताप यांच्या वतीने संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरणटाईन करण्यात आले असून सर्व संशयितांचे नमुने नियमाप्रमाणे तपासणी साठी पाठवयण्यात येणार आहेत. या यावेळी आझमशाहीपूरा परिसर सील करण्यात आले आहेत. तसेच खुलताबादकरांना विनाकारण घराबाहेर फिरू नका, घरात रहा सुरक्षित रहा, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आव्हान करण्यात आले आहे.यावेळी आझमशाही पूरा व पोस्ट ऑफिस परिसर सील करतांना पोलीस कर्मचारी भावसिंग जारवाल, साबळे, यतीन कुलकर्णी, गणेश लिपणेसह कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment