शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा
औरंगाबाद । वार्ताहर
दिवसेंदिवस कोरोनाचे संकट औरंगाबादेत अधिक होत आहे. ही चिंतेची बाब लक्षात घेऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्पर राहावे तसेच कोविड - 19 ला संपविण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदयकुमार चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, ऍड. अशोक पटवर्धन ग्रामीण भागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरात अनेक भागात परिसर सील करण्यात दिरंगाई झाल्याचे बैठकीत निदर्शनास आणले. जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, आदी ठिकाणी वाढत्या रुग्णाबाबत प्रशासनाने अधिक उपाय करण्याची सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
Leave a comment