शिवसेनेचा कोविड 19 रुग्णासाठी सामाजिक उपक्रम
औरंगाबाद । वार्ताहर
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावतीने कोरोना रुग्णासाठी मोफत विलगीकरण केंद्र (क्वारंटटाईन सेंटर) सुरू करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाचे पदमपुरा येथील संत तुकाराम वस्तीगृहात शिवसेनेच्या वतीने हा मोफत सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. यावेळी आमदार संजय शिरसाठ यांच्याहस्ते तर मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
या विलगीकरण केंद्रात शेकडो रुग्णांना दोन वेळचे पोटभर जेवण, राहण्यासाठी लागणारे साहित्य, तेल, पावडर, कंगवा, आदी जीवनावश्यक साहित्य मोफत देणार आहे. या लोकार्पणप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, अॅड. आशुतोष डंख, शिवसेना नगरसेवक सचिन खैरे, किशोर कच्छवाह, गजानन बारवाल, भरत बरथुने, सारंग विधाते, डॉ. निलगिरिकर, उपशहरप्रमुख संतोष मरमठ, संतोष जाटवे, सचिन जिवनवाल, प्रकाश बरथुने, शीतल जाटवे, प्रतीक बाफना, सुनील दायमा, लक्ष्मण गिरे, रामेश्वर पेंढारे, रणजित ढेपे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a comment