बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगाव बाजार व परिसरात अनेक दिवसापासुन लक्की ड्रॉ कुपनच्या नावाखाली अवैधरित्या संगणक लॉटरीची दुकाने थाटली आहे, या प्रकरणी संबधीत पोलीस व महसुल विभागाचे हेतूपुरस्कर दुर्लक्ष ? तरी वरिष्ठ आधिकांर्यानी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन सदरील अवैध लॉटरीचे दुकान त्वरित बंद करावे अशी मागणी गावकर्यांतुन होत आहे.
बोरगाव बाजार व परिसरातील अनेक दिवसापासुन लक्की ड्रा कुपनच्या नावाखाली सुपरस्टार लक्की कुपन यानावाने अवैध संगणक लॉटरीचे दुकाने सुरू झालेली आहे,व हे अवैध लाँटरीचे निकाल (सोडत) सर्व चिचोली लिबांजी ता.कन्नड येथुन चालविण्यात(काढण्यात) येते, याअवैध लाँटरीमुळे परिसरातील सर्व लहान-मोठे या लॉटरीच्या नादाला लागुन आपले कामधंदे सोडून व या लॉटरीचा दुकानावर थानमाडुन बसतात,कारण निकाल आकड्यावर पैसे लावल्यानंतर पुढील पाच मिनिटांने निकाल येत असल्यामुळे लॉटरीच्या दुकानात व परिसरात गर्दी करताना दिसतात व यात मालक एक कमी पैसे लागलेला आकडा काढतो, बाकी चालक आपल्याकडे जमा करुन घेत आसतो, यामुळे बोरगांव व परिसरात आबाल-वयोवृध्द काही कामधंदा नकरता दिवसभर या अवैध लॉटरीच्या नांदी लागुन, आपल्याकडील असलेले सर्व पैसे या लॉटरीवर लावतात व हरतात,व निराश होऊन पर्यायाने दारु, सिगारेट, गांजा या अशा अनेक व्यसनांच्या आहरी जातात (गेले) आहे व लॉटरी दुकान परिसरावर नेहमीच तरूण व वयोवृध्दाची गर्दी दिसुन येते, या अवैध लॉटरीमुळे शासनाचा लाखोचा महसुल व बुडतोच तसेच बेकारीचे प्रमाण वाढविण्याचे काम यामुळे होत आहे,या अवैध लॉटरीविषयी लाँटरी मालकाला विचारणा केली आसता तर मी सिल्लोड ग्रामिण पोलीसांनपासुन ते वरपर्यत हफ्ते देत आसल्यामुळे आमच कोणी काहीच करु शकत नाही,व संबधीत पोलीस व महसुल विभागाला याची सर्व माहीती आहे, कि बोरगाव बाजार परिसरात सुपरस्टार लक्की कुपन यानावाने अवैध संगणक लॉटरी चालते,असे लॉटरीमालकांने सांगितले. तरी संबधीत वरिष्ट जिल्हाधिकारी कार्यलयातील वरिष्ठ आधिकांर्यानी या प्ररकरणाकडे विशेष लक्ष देऊन या अवैध संगणक लॉटरी मालक-चालकांवर कार्यवाही करावी अशी मागणी गावकर्यांतुन होत आहे.
Leave a comment