लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर कर्जधारकांना दिलासादायक मदत
भराड़ी । वार्ताहर
मागील काही वर्षांपासुन ग्रामीण भागातील महीलांना स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्याकडुन महिला बचत गट तयार करून त्या गटातील महीलांना कर्जाचे वाटप करण्यात येत आहे.मागील तिन महिन्यापासून संपुर्ण जगभरात कोरोणा व्हाईरस या आजाराने थैमान घातलेले आहे.त्यामुळे तिन महिन्यापासून सर्वच फायनान्स कंपन्याकडुन कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
सिल्लोड शहरात स्वमान फायनान्स कंपनीची शाखा असुन या कंपनीकडून लॉकडाऊनच्या काळातील मजुरवर्गाची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील स्वमान फायनान्स कंपनीचे एरीया मॅनेजर व शाखा प्रमुख समाधान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत वांगी बुद्रुक तसेच लिहाखेडी येथील कर्जदार महिला सदस्यांना लॉकडाऊनसारख्या संकटाच्या काळात एक मदत म्हणुन सोशल डिस्टंन्स ठेवुन कंपनीच्या वतीने मास्क, सॅनेटायझर, अन्नधान्य व किराणा वस्तुचे किट सोमवार रोजी वाटप केले. यावेळी एरिया मॅनेजर प्रविण जानवे, वित्त सहाय्यक नदीम सय्यद, अभिजीत रगडे, सचिन राठोड, अमोल सरकाटे, ऑडीट डिपार्टमेंटचे योगेश सुराशे आदी कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment