औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत हाताला काम नाही, वाहन भाड्याने कोणी घेत नाही अशा वाहनांचे हप्ते भरायचे कसे याची चिंता पडली आहे. अनेक जण खाजगी पतसंस्था, खाजही सहकार बँकेतून कर्ज घेतल्याने त्यांना हप्ते भरावे लागतात. त्यामुळे सरकारने बँक आणि पतसंस्थांना हप्ते न घेण्याच्या सूचना कराव्यात आणि आर्थिक मदत करावी या मागणीसाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून मागणी करणार्या या वाहन चालक आणि मालकांना प्रशासन मदत करीत नाही. अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे जय संघर्ष वाहन चालक संस्था, संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.
Leave a comment