औरंगाबाद । वार्ताहर
एखादा मुख्यमंत्री रक्तदानाचं आवाहन करतो आणि त्यांचा शब्द प्रमाण मानून हजारो शिवसैनिक कसलीही तमा न बाळगता रक्तदान करतात, असे प्रथमच घडत असेल.
जिल्ह्यात आज युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त संभाजी नगर उपमहापौर, युवासेना उपसचिव,शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि युवासेना संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदानात आत्ता पर्यंत किमान 1300 पेक्षा अधिक शिवसैनिकांनी रक्तदान केले आहे. दरम्यान, उत्तम नियोजन व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून अधिकाधिक शिवसैनिकांनी रक्तदान केल्याबद्दल औरंगाबाद येथील शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment