वैजापूर । वार्ताहर
वैजापूर तालुक्यातील चिंचडगांव येथील नागरिकांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवण्यासाठी ग्रामसेवकाकडे चार नंबर फार्म भरून कामाची मागणी केली पण ग्रामसेवक यांनी टाळा टाळा केल्यामुळे नागरिकांनी दोन - तीन दिवस वाटपाहुन ग्रामसेवकांचे सहकार्य मिळत नाही असे लक्षात आल्यावर मजुरांनी कुटूंब प्रमुखांच्या नावे पुढे कुटूंबात असलेल्या मजुरांची संख्या नोंदवून जिल्हा कलेक्टरकडे एकूण 185 लोकांना ईमेल द्वारे कलेक्टरकडेच कामाची मागणी केली आहे.
कारण सर्व नागरिकांची कोविड -19 मुळे उपासमार होत असल्या कारणाने कामाशिवाय पर्यायच नाही असे म्हणणे आहे कलेक्टरच्या आदेशानुसार पंचायत समिती वैजापूर यांची यंत्रणा कामाला लागली व क्लेकटर यांचे आदेश मिळताच सोमवारी लोकांच्या नावाचे मस्टर जनरेट करुन लगेच प.समिती तांत्रिक काकडे,साळवे हे मंगळवारी चिंचडगांव येथे हजर झाले परन्तु मजुरांची संख्या मोठया प्रमाणात असल्यामुळे त्यांना मंजुरांना काम देणे शक्य झाले नाही दोन तीन दिवसात काम उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देऊन त्यांनी मंजुराच्या घोळक्यातुन पळ काढला सदरील लोक जनजागृती चे काम निर्भय संस्थेच्या वतीने करण्यात आले
Leave a comment