जालना तालुक्यातील नेर व सेवली आणि परतूर तालुक्यातील आष्टी येथे रक्तदान शिबिर संपन्न
जालना । वार्ताहर
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कोरोना प्रादुर्भाव काळात महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासू देणार नाही असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रक्तदान शिबिराचे मराठवाडा संयोजक राहुल लोणीकर यांनी केले भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात केले जात असून परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये जालना तालुक्यातील नेर व सेवली आणि परतूर तालुक्यातील आष्टी येथे आज रक्तदान महायज्ञ संपन्न झाला त्यात नेर येथेे 171 येवली येथे 131 तर आष्टी येथे 271 रक्तदात्यांनी रक्तदान केले संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यात 119 मंडलामध्ये रक्तदान शिबिरे होणार असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रचंड रक्तसाठा महाराष्ट्राकडे उपलब्ध होणार आहे.
मराठवाड्यातील 119 पैकी 108 मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे नियोजन झाले असून पुढील आठवडाभरात ही सर्व रक्तदान शिबिरे होणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी ङ्गडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा.पुनमताई महाजन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी कोरूना प्रादुर्भाव काळात रक्तदान शिबिरे घेऊन रक्ताचा साठा कमी पडणार नाही याची दक्षता घ्या अशी सूचना आणि आवाहन भाजपा युवा मोर्चा ला केले होते त्यानुसार भाजपा युवा मोर्चा ने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असल्याची माहिती रक्तदान शिबिराचे मराठवाडा संयोजक तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली. दिनांक 13 जून रोजी परतूर येथे रक्तदान शिबिर,भाजपा युवा मोर्चा ने रक्तदान शिबिराच्या आयोजनाची मराठवाडा विभागाची जबाबदारी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्याकडे दिली असून त्याचाच एक भाग म्हणून मंठा तळणी जयपुर वाटुर ङ्गाटा नेर शेवली आष्टी इत्यादी ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले असून दिनांक 13 जून रोजी परतूर येथे देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मतदारसंघातील जे लोक विविध आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करू शकले नाहीत त्यांनीदेखील या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून राष्ट्र कार्याला हातभार लावावा असे आवाहन रक्तदान शिबिराचे मराठवाडा संयोजक प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले आहे.
Leave a comment