मंठा । वार्ताहर
तालुक्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्ङ्गत बाजार समिती अंतर्गत सुरु असलेली कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. कापूस खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला कापूस पावसाने भिजल्याने अतोनात नुकसान झाले असल्याने मा.मंत्री तथा आ.बबणराव लोणीकर यांच्या सुचणेनुसार बाजार समितीचे सभापती श्री संदीप गोरे उपसभापती श्री राजेश मोरे,सर्व संचालक व जिल्हा उपनिबंधक श्री नानासाहेब चव्हाण, यांनी खरेदी केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता कापूस खरेदी केंद्रावर कापसाच्या गंजी संपूर्णतः भिजलेले असल्याचे दिसून आले. तर कापसाच्या गठान व सरकी हे पण झाल्याचे दिसून आले.
नुकसान झालेल्या कापसाची जबाबदारी जिनिंग मालकाचे असल्याने त्यांनी पुढील काळात कापूस खरेदी करण्यास असमर्थता दाखवली आहे मात्र बाजार समितीचे सभापती संदिप गोरे, उपसभापती राजेश मोरे यांनी शेतकर्यांची बाजू लावून धरत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण,जिणींग मालक यांच्याशी चर्चा करून उर्वरित शेतकर्यांचा कापूस घेण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी आग्रही भूमिका घेतली. पावसामुळे कापूस खरेदी बंद राहू नये यासाठी बाजार समितीच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी उपसभापती राजेश मोरे यांनी बाजार समितीच्या वतीने देण्यात आले. पावसामुळे कापूस खरेदी केंद बंद असल्याने शेतकर्यांनी मात्र धीर सोडू नये असे आवाहनही बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment