परतूर । वार्ताहर
चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या परतुर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे, नगरपालिकेला आपल्या दारावरचा रस्ताचं पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करता आलेला नाही तेव्हा शहराचे हाल सांगण्याची गरज राहिलेली नाही. घराची अवस्था हे अंगण सांगत असते या म्हणी प्रमाणे परतुर शहराची अवस्था नगरपालिकेच्या समोरचा रस्ता पहिला की कळून येते. नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही या सबबीखाली नगरपालिका प्रशासन हात झटकत आले आहे, पण याखाली निदान अत्यावश्यक कामे तरी टाळली जाऊ नयेत, पावसाळ्यापूर्वी शहरात साङ्गसङ्गाई मोहीम राबवणे ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी असते, पण परतूरकरांना हे भाग्य यावेळी अनुभवायला आले नाही.
परिणामी उन्हाळ्यात मच्छरांनी तर आता पावसाळ्यात विविध प्रकारच्या रोगाचा सामना करण्याची वेळ आली आहे. कोरोना व लॉकडाऊनचे नाव घेऊन अत्यावश्यक कामांना ङ्गाटा देता येणार नाही, तर अशा परिस्थितीत ही शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी नगरपरिषद कायम तत्पर असायला हवी, पण ही तत्परता कुठे दृष्टीस पडतांना दिसत नाही. उलट गेल्या दोन दिवसात परतुर शहरात सर्वत्र चिखल झालेला असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. रेल्वे स्टेशन चौक,आष्टी रेल्वे गेट,कॉलेज रोड,पंचायत समिती ते बसडेपो रोड चिखलमय झाले आहेत. तर नगरपालिका कार्यालयाच्या नाकावरचा रस्ता चिखलात रुतलेला आहे लॉकडाऊन मुळे मोठ्या निधीचा प्रश्न निर्माण झाला असला तरी आपल्या राजकीय कौशल्याने रस्ते चालण्यायोग्य करायला हवेत.अशा क्षणी खरी कसोटी पहायला मिळते, लॉकडाऊन मुळे काहीच करता येत नाही म्हणून हात वर करणे कसोटीवर उतरत नाही.तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने चिखलमय रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.
Leave a comment