कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
आखाडा परिषदेचे स्थाई सभासद, सचिव श्री महंत आनंद आखाडा (पूर्ण भारत देश ) भारतामधील आनंद आखाड्याचे पूर्ण आनंद आखाड्याचे व्यवस्थापक तथा राजाटाकळी तुळजाभवानी संस्थान चे अध्यक्ष गोशाळेची नियंत्रक महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या संत मराठवाडा संघटक मंत्री पदी ता. 12 शुक्रवार रोजी नियुक्ती करण्यात आली संत सुरक्षा परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजराजेश्वर गिरीजी महाराज यांच्या आदेशावरून संत सुरक्षा परिषदेचे सचिव डॉ. पद्मनाथ गिरीजी महाराज यांनी ही नियुक्ती केली आहे 108 संत व्यक्तींना जोडून आपल्या प्रदेशची सुंदर कार्यकारणी जोडून राष्ट्रीय हीत, राष्ट्रीय संत के हित, समाज के हित, धर्म के हित ,मानवता के हित मे सेवा, संस्कार, सुरक्षा या तीन सूत्रा नुसार आपण शुभ कार्य करावे असे नियुक्ती पत्रकात म्हटले आहे . महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांचे सामाजिक ,धार्मिक , धर्म रक्षंन ,सर्वधर्म समभाव संत विचाराचे मोठे कार्य असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल राजाटाकळी ,कुंभार पिंपळगाव ,घनसावंगी ,अंबड ,जालना सह परिसरातील सर्व शिष्य परिवार , संत ,महंत, वारकरी संप्रादायातुन अभिनंदन होत आहे.
Leave a comment