बदनापूर । वार्ताहर
माणुसकीचा काळीमा ङ्गासणारी घटना तालुक्यात घडली असून दारूडया मुलाने आपल्या जन्मदात्या वृध्द आईचा तीक्ष्ण हत्याराने गालावर व डोक्यात वार करून खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की बदनापूर तालुक्यातील लालवाडी तहत घाटी शिरसगाव येथील भागचंद दगडू बारवाल हे त्यांच्या पुतण्याची वास्तुशांती असल्यामुळे त्याच्या घरी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.
या वेळेची संधी साधून त्यांचा दारूडा मुलगा गोपीचंद बारवाल (वय 35) याने त्यांची आई अन्साबाई बारवाल (वय 60) यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने गालावर व डोक्यावर वार करून आईचाच खून गोपीचंद यांनी केला. गोपीचंद याने आईवर वार केल्यानंतर स्वत:च्या मामाच्या मुलाला ङ्गोन करून आपल्या आईला मारून टाकले असे कळवून ङ्गरार झाला. गोपीचंद याला दारूचे व्यवसन असल्याची माहिती मिळत असून दारूच्या नशेमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्याने हा प्रकार केला या बाबत पोलिस तपास सुरू आहे. या बाबत माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक शामसुदंर कोठाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिमाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी ङ्गरार आहे. आरोपी गोपचींद भागचंद बारवाल यांच्या विरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात भादंवि 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment