नेकनुर/ वार्ताहर
तीन वर्षापासून धीम्या गतीने सुरू असलेल्या मांजरसुंबा केज रस्त्यावरील नांदुर फाटा जवळ पुलाच्या कामामुळे बाजूने जाणारा रस्ता खचल्याने एक मालवाहू ट्रक अडकली दोन्ही साईड ने वाहनाच्या दूरवर रांगा लागल्या होत्या यामुळे वाहनधारकात तीव्र संताप निर्माण झाला .
एसपीएम या कंपनीने मागच्या तीन वर्षात अनेक जागी रस्त्याचे अपूर्ण काम करून प्रवाशांना वेठीस धरले आहे . पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने बाजूने केलेला पर्यायी रस्ता कालच्या पावसात खचल्याने नांदुरफाटा येतील पूुलावर एक मालवाहतूक ट्रक अडकल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागला तर काहीजण कंपनीच्या वरिष्ठांना याठिकाणी येण्यासाठी संपर्क करीत होते. राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात असून नेकनूर येतील बीड रस्त्यावर खोदून ठेवलेला अर्धवट रस्ता अनेकांना मोठ्या संकटात ढकलणारा ठरला यामुळे अनेकांना अपघातग्रस्त व्हावे लागले अजूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रवास करताना विशेषता दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Leave a comment