बीड । वार्ताहर
बीड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाज करताना कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी तसेच शारिरीक, मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून आणि पोलीस कोव्हिड-19 सुरक्षा सेलच्या समन्वयातून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसाठी सुदर्शनक्रिया या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा ही जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दि.16 ते 23 जून या कालावधीत प्रत्येकी 4 दिवसांच्या कोर्समध्ये सकाळी 6 ते 8 आणि सांयकाळी 6 ते 8 या वेळेत घेण्यात येणार आहेत. ही कार्यशाळा झुम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने झूम क्लाऊड मिटींगद्वारे पार पडणार आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाणे व पोलीस कार्यालयांमध्ये सुचना देवून या कार्यशाळेस हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.दरम्यान अधीक्षक पोद्दार यांच्या आदेशाने यापूर्वीच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी पोलीस कोव्हिड-19 सुरक्षा सेल स्थापन करण्यात आला आहे.या सेलचे प्रभारी अधिकारी म्हणून सपोनि योगेश खटकळ हे कामकाज करत आहेत.
Leave a comment