आष्टी तालुक्यात दररोज दोन लाख लिटर पेक्षा जास्त दुध संकलन
पशुखाद्य मिळण्यात येतात अडचणी
दुधाचे दर कोसळले,शेतकऱ्यांचे गणित बिघडले

आष्टी : रघुनाथ कर्डिले

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे दुध व्यवसायावर अवलंबून असुन तालुक्यात दररोज दोन लाख लिटर पेक्षा जास्त दुध उत्पादित होत आहे.परंतु गेल्या महिन्यात कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊन चा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला असून हा व्यवसाय आता संकटात सापडला आहे. पर्यायाने जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

आष्टी तालुक्यात नेहमीच पाऊस कमी पडत असल्याने सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे त्यात औद्योगिक वसाहती नसल्याने हाताला काम नाही यामुळे बेरोजगारी वाढली असल्याने अनेक गावातील सुशिक्षित शेतकरी तरुणांनी दुध व्यवसाय सुरू केला आहे.तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे गाई आहेत.दूध व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय बनला आहे.जगण्याचा आधार म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याने साहजिकच दुधसंकलन केंद्रांची संख्या वाढली. मात्र दुधाचे उत्पादन वाढत गेले आणि दुधाला मिळणाऱ्या भावात चढाओढ सुरू झाली. परिणामी गावागावात दुधसंकलन केंद्र सुरू झाले.सर्व दुधसंकलन केंद्रावर मिळून दररोज दोन लाख लिटर पेक्षा जास्त दुध संकलन होत आहे.

पूर्वीची परिस्थिती--दुधाला फॅट व एसएनएफ नुसार दर दिला जातो.3•5 फॅट व 8•5 एसएनएफच्या दुधाला 34 रु.लिटर भाव मिळत होता.

सद्य परिस्थिती--
लॉकडाऊन मुळे मागील महिन्यापासून दुधाच्या भावात लिटरमागे १२ ते १४ रुपयांची घसरण असुन सध्या २० ते २५ रुपये लिटरप्रमाणे दुध खरेदी केले जात आहे.
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांपर्यंत खर्च
येतो मात्र हेच दूध सध्या 20 रुपये लिटर ने विकले जात अश्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे जनावरांना
लागणारा खुराक हि लॉकडाऊन मुळे वेळेवरती मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून
शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
■■■■
यावर्षी तालुक्यात पाऊस कमी झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली नाही परिणामी जनावरांसाठी चारा कमी प्रमाणात तयार झाला.आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने चारा संपला असून लॉकडाऊन मुळे मार्केट मध्ये चारा विक्रीस येत नाही त्यामुळे जनावरांसह शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
■■■
संचारबंदी मुळे सर्वसामान्य लोकांना पेट्रोल देने बंद केले असून दूध घरापासून डेअरीवर आणायचे कसे?असा प्रश्न निर्माण झाल्याने अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांना पेट्रोल देण्याची सोय करण्याची मागणी होत आहे
■■
कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. दुधाचे दर प्रति लिटर तब्बल 12 ते 14 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे
पाण्याच्या भावात दुध विकले जात आहे. दुध उत्पादनाचा खर्चही निघत नाही. शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळलो मात्र आता हाच दुग्ध व्यवसाय
अडचणीत आला असून संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने देश तब्बल 21 दिवस लॉक डाउन झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला असून दुधाचे दर हे तब्बल 12 ते 14 रूपयांनी कमी केले आहेत. दुधाचे दर हे 34 रूपये लिटर वरून थेट आता 22 ते 24 रूपये लिटर वर
आले आहेत.त्यामूळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..

श्रीहरी खेंगरे
दुध उत्पादक शेतकरी
■■■■■
कोरोना लॉकडाऊन मुळे दुध व्यवसाय अडचणीत सापडला असुन ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस सरकार सारखे दुधास 10 रुपये लिटर प्रमाणे अनुदान देणे आवश्यक आहे.दोन वर्षांपूर्वी दुधाचे दर पडले होते त्यावेळी फडणवीस सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देऊन शेतकरी वर्गास दिलासा दिला होता.

आ.सुरेश धस
विधानपरिषद सदस्य

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.