जवळचे नातेवाईक अंत्यसंस्कारास अनुपस्थित
परतुर । वार्ताहर
आज रविवारी सकाळी मापेगाव ता.परतुर येथील तरूण कोरोना ने मृत झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या तरुणावर जालना येथील मुस्लिम समाजसेवकांनी कब्रस्थानात दफनविधी केला. यावेळी त्याचे जवळचा कोणीही नातेवाईक उपस्थित नव्हता.
परतुर तालुक्यातील मापेगाव येथील एक कुटुंब ठाणे येथून 19 मे ला गावात आले होते,त्या कुटुंबाला मापेगाव च्या शाळेत अलगिकरण करण्यात आले होते.29 मे ला त्यातील 45 वर्षाच्या व्यक्तीला श्वासघेण्याचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याला जालना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु त्याचे रात्री उशिरा निधन झाले.त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास कुटूंबाने असमर्थता दर्शविली, पण जालना येथील जमाते हिंद चे समाजसेवक शेख अक्कतर,अमजद खान,अकबर खान व इतरांनी कब्रस्थानात रीतसर दफनविधी केला.
मृत तरुण गावाबाहेर च्या शाळेत वास्तव्यास होता त्यामुळे गाव सील करण्यात आले नाही, यात 21 जनांचे लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करता पाठवले असून या सर्वांना आंबा येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर नवल यांनी सांगितले.
Leave a comment