आष्टी । वार्ताहर
आष्टीचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते सय्यद शफी स. शरीफ यांनी लॉकडाऊन काळात कामधंदा नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या 30 गरजू कुटुंबांना आर्थिक मदत घरपोच करून सामाजिक सौहार्दाचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.
सय्यद शफी हे आष्टी शहरातील क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते आहेत. सध्या कोरोनामुळे आष्टी लॉकडाऊन असल्यामुळे अनेक हातावरचे पोट असणार्‍या मजुरवर्गांची हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.इस्लाम धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीने उत्पन्नाच्या अडीच टक्के रक्कम गरजूंना वाटप केल्यास पूर्वत्रांचे स्मरण करून त्यांचा दुवा मिळावा आपल्या मुलाबाळांना काही अडचणी येत नाहीत असे मानले जात असल्याने पवित्र रमजान महिन्यात दरवर्षी वार्षिक सय्यद शफी हे वार्षिक उत्पन्नाच्या अडीच टक्के रक्कम गरजू गोरगरिबांना वाटप करत असतात. लवकरच रमजानचा महिना सुरू होणार आहे. त्यावेळी द्रव्यदान करावायाचे आहे तेच आजच्या काळात वाटप केल्यास. त्यातून पुण्य लाभ मिळू होऊ शकतो. कारण ‘हीच खरी वेळ’ आहे मदत करण्याची हे लक्षात घेऊन त्यांनी शहरातील विधवा महिला ,मजूर,अपंग असे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारे हिंदू,मुस्लीम असा भेदभाव न करता 30 कुटुंबांना प्रत्येकी 500 रुपये रोख रक्कम आणि ती ही प्रत्येकी 50 रुपयाचा 10 नोटा एका पाकिटात घालून स्वतः घरपोच मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेकांनी धन्यवाद देऊन कौतुक केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.