वडवणी । वार्ताहर
लॉकडाऊन काळात वृध्द महिला पुुुरूष यांंना संजय गांधी व श्रवाान बाळ योजनेअंतर्गत आर्थिक मदत होईल म्हणून सरकारने प्रत्येक महिलांच्या खात्यात 2000 रुपये प्रमाने खाते अंतर्गत जमा केल्यानंतर ते पैसे काढण्यासाठी बुधवारी (दि.8) एप्रील रोजी वडवणी शहरात स्टेट बँका समोर तसेच काही बाकीचेेे खातेदार एटीएम वर पैैैसे काढण्याासाठी मोठी गर्दी केलेली दिसुन आली होत तर वृृध्द महिला आणि पुरुषांची कायदा मोडून प्रचंड रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अखेर गर्दीला आवरण्यासाठी आणि त्यांना अंतर ठेवण्यासाठी बॅकँ कर्मचारी आणी बँकेचा गार्ड यांनी सर्व नागरीकांना आंतर ठेऊन लाईन करा सर्वाना पैैसे मिळतील असे सांगीतले आणी प्रत्येकाला एक एक जन आत मध्ये सोडले गेले. लॉक डाऊन काळामध्ये नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तसेच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून देशााचे पंतप्रधान मोदी साहेेबानी भारतातील प्रत्येक महिलांच्या जनधन खात्यामध्ये 500 रुपये जमा करण्यात आले आहेत. आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची वार्ता वडवणी तालुक्यात पसरल्यानंतर आज सकाळी अकरा ते दोन संचारबंदी शिथिलच्या वेळेमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांनी सकाळी दहा वाजल्यापासून बँकांसमोर प्रचंड रांगा लावल्या. या रांगेमध्ये महिलांच्या बरोबरीने पुरुषही थांबले होते सकाळी 11 वाजता बँका उघडण्यापूर्वी लोकांनी तोबा गर्दी केली होती कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा म्हणून सरकार वारंवार सांगत आहे परंतु पैशापुढे लोकांनी या नियमाला फाटा देत प्रचंड गर्दी केली. या गर्दीमुळे लोकांना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून अखेर पोलीस बँका समोर येऊन लोकांना लाईनमध्ये लावत होते. वडवणी शहरात हे चित्र स्टेट बँक ऑफ इंडिया, समोर बघायला मिळत होते. स्वतःच्या जीवाची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जनतेसाठी शासन आवाहन करत आहेत.
Leave a comment