बीड । वार्ताहर
वैश्‍विक कोरोना महामारी ने संपूर्ण जग त्रस्त झाले. देश खडबडून जागा झाला. आज तरी आरोग्य हाच विषय सर्वांच्या रडारवर आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत जनजीवन ढवळून निघाले. शासन-प्रशासन स्तरावरून जनतेच्या मूलभूत गरजा व सोयी पुर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दुर्देवाने बीड नगर पालिका प्रशासनाच्या कारभारावर कोरोना महामारीआपत्तीचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. एरवी सुंदर शहर स्वच्छ शहर या घोषणेच्या प्रचारासाठी लाखो रुपये खर्च करणार्‍या नगरपालिकेने बीड शहराचे आरोग्य आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना पार्श्‍वभूमीवर अगदी ग्रामपंचायतीने देखील गाव निर्जंतुक करण्याचा कार्यक्रम राबवला. परंतु बीड नगरपालिकेच्या प्रशासनामार्फत या कामी प्रामाणिकता व गांभीर्य दिसून आलेले नाही. संपूर्ण शहर सॅनेटायझरींग करणे आवश्यक असताना काही मोजक्याच ठिकाणी फवारणी केली गेली. त्यात कोणते रसायन किती वापरले हे सांगता येणार नाही. रसायनांचा कोठेही प्रभाव लक्षात आलेला नाही. शिवाय शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य थोडे फार कमी जाणवत असले तरी डासांचे थैमान आहे तसेच आहे. शहर स्वच्छता तोकड्या सफाई कामगारांच्या मदतीने चालू आहे. दोन महीन्यांचा पगार थकबाकी असताना ही ते निमुटपणे काम करतात. कोरोना आपाद परीस्थितीत त्यांचे कौतुकच करावे लागेल. कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये शहरव्यापी डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविणे आवश्यक असतांना याकडेही दुर्लक्ष झाले. नवीन फॉगींग मशिनचे (धुरफवारणी) फोटो झळकले परंतु त्याचा वापर आणि परिणाम दिसला नाही. काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षां मार्फत शहर निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्याचा मनोदय व्यक्त केला असता त्यास प्रशासनाने परवानगी नाकारली.
नगरपरिषद प्रशासनाने 100%निर्जंतुकीकरणाचे कामस्वतः ही केले नाही आणि इतरांनाही करू दिले नाही यामागचे गौडबंगाल लपूनच राहिले आहे. एकीकडे वारंवार हात चेहरा स्वच्छ धुवा असा सल्ला द्यायचा आणि प्रत्यक्षात मुबलक पाणीसाठा व विद्युत पुरवठा असतानादेखील बीडकरांना आठ ते दहा दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. कोरोना लॉकडाऊन काळामध्ये प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी अपेक्षीत होती. संपूर्ण शहर स्वच्छता, जनतेला मुबलक पाणीपुरवठा व 100% वैज्ञानिक दृष्टिकोनातून बीड शहराचे निर्जंतुकीकरण करणे डास निर्मुलनाची मोहीम राबवणे यासारखी आरोग्यवर्धक कार्यक्रमावर भर देऊन बीड शहरवासीयांना स्वच्छतेची हमी देणे गरजेचे असताना बीड नगरपालिकेने याकडे पाठ फिरवलेली आहे. किमान कोरोना महामारी संकटाचा ध्यास घेऊन सामान्य जनांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे तरी बीड नगरपालिकेने शहराच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच कोरोना फाइटर म्हणुन देशभर सफाई कामगारांचे कौतुक होत आहे. सफाई कामगारांचा थकीत पगार प्राधान्याने करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.