जालना | वार्ताहर
जिल्ह्यातील पाच संशयीत रुग्णांचे अहवाल शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 122 वर गेली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.जिल्हा रुग्णालयातुन शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील 173 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ पाच संशयीत रुग्णांचे अहवाल जिल्हा रुग्णालयास शुक्रवारी रात्री प्राप्त झाले असून ते सर्व पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यात जालना शहरातील मंठा चौफुलीजवल असलेल्या साईनाथ नगर आणि भोकरदन तालुक्यातील धावडा येथील प्रत्येकी एक आणि घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील 3 अशा पाच जणांचा समावेश असून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 122 पर्यंत पोहचली आहे.दरम्यान, शुक्रवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एकूण 173 संशयीत रुग्णांच्या अहवालापैकी केवळ पाच जणांचे अहवाल प्राप्त झाले असून अद्याप 168 प्रलंबित असल्यामुळे चिंता वाढली आहे .
Leave a comment