दोन दिवसांनी संचारबंदी शिथिल केल्याने शहरात मोठी गर्दी
आष्टी । शरद रेडेकर
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तालुक्यातील संचारबंदी एकदिवसाआड शिथील करण्यात येत असल्याने,आज सकाळी अकरा वाजता शहरात बाजारात भाजीपाला व किराणा घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने शहरात सोशल डिस्टंस्टचा फज्जा उडला असून,नाईलाजास्तव महसूल व पोलिस प्रशासनाने बाजार बंद केला.
बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आष्टी तालुक्यात सम तारखेला एक दिवसाआड संचारबंदी 11 ते 2 वेळेत शिथील करण्यात येणार असून,आज दि.8 रोजी नागरीकांनी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी व किराणा घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने आष्टी तहसिलच्या नायब तहसिलदार शारदा दळवी यांनी बाजारतळात येऊन नागरिकांना सोशल डिस्टंनच्या बाबतीत सुचना केल्या तरीही नागरिक कसल्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलासांना आजचा बाजार नाइलाजास्तव बंद करावा लागला.दरम्यान नागरिकांनी या भयान रोगाची लक्षणे ओळखून घेऊन आता या रोगाने तालुक्यात शिरकाव केला तरिही लोकांना काहिच गांभिर्य नसल्याने येथील परिस्थिती हाताबाहेर जातअसल्याने हे भाजी मार्केट बंद करावे लागले असल्याचे नायब तहसिलदार शारदा दळवी यांनी सांगितले.
09
Apr
Leave a comment