धारुर । वार्ताहर
धारूर तालुक्यातील 6800 महिलांना उज्वला गॅस योजनेतून तीन गॅस सिलेंडर टाक्या मिळणार आहेत कोरोना या विषाणूच्या महाभयंकर संकटाचा सामना करताना भारत देशात लॉक डाऊन सारखे कठोर पाऊल उचलावे लागले होते
देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार केंद्रशासनाच्या वतीने उज्वला गॅस लाभार्थ्यांना तीन महिने एप्रिल, मे , जून या तीन महिन्यांसाठी 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे.उज्वला गॅस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला गॅस सिलिंडरचे पैसे बॅक मध्ये अॅडव्हान्स जमा केले जात आहेत .सिलेंडर भरून घेताना गॅस एजन्सी कडे रोख स्वरुपात रक्कम जमा करावी लागनार आहे लाभार्थ्यानी रजिस्टर मो.नंबर 8888823456, 9420423456 यावरून बुकिंग करावी .एका महिन्याला एकच सिलेंडर .दुसर्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना तेव्हाच मिळतील जेव्हा लाभार्थ्यांनी पहील्या महिन्याचे गॅस सिलिंडर घेतलेले असेल ज्याचे मोबाईल नंबर गॅस एजन्सी मध्ये लिंक असेल त्यांनी या योजनेचा तात्काळ लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे जर मो.नंबर लिंक नसेल तर तो करन्यासाठी ग्राहकानी आधार कार्ड, मोबाइल, गॅस कार्ड सोबत घेवून गॅस इजनशी कडे संपर्क साधावा सिलेंडरची बुकिंग होताच घरपोच गॅस मिळणार असल्याचे व्यवस्थापक सुनील भोसले यांनी सांगितले.
Leave a comment