धारुर । वार्ताहर
धारूर शहरातील जीवनावश्यक वस्तूंची किराणा सामानाची विक्री करणार्या व्यापार्यांची बैठक धारूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास हजारे यांनी आज घेतली शहरातील एकही व्यापारी चढ्या भावाने किराणा सामानाची विक्री करत नसल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक नाना जाधव यांनी सांगितले.
किराणा माल आणण्यासाठी अनंत अडचणी असताना देखील एक माणुसकी धर्म पाळून धारूर शहरातील सर्व किराणा व्यापारी तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यापारी हे चढ्या भावाने न विकता योग्य त्या भावाने विकत असल्याचे व्यापारी वर्गा कडून सांगण्यात आले. काही नागरिकांनी तक्रारी केल्याने कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास हजारे यांनी तत्काळ व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक नाना जाधव यांच्या अध्यक्षतखाली बैठक घेवून जीवनावश्यक वस्तू योग्य दराने विक्री करण्याची विनंती केली अध्यक्षांनीही सर्व व्यापारी प्रशासनास सहकार्य करतील असे आश्वासन दिले यावेळी गजानन गुंडेवार, निलेश दुबे, वडगावकर, सचिन गुंडेवार यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
Leave a comment