मिळणार प्रती सदस्य पाच किलोप्रमाणे मोफत तांदूळ
किल्लेधारूर । वार्ताहर
धारूर तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्यान अन्न योजना व अंत्योदय शिधापत्रिका मधील 21 हजार 905 कुटूंबांना प्रती सदस्य पाच किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे . मोफत वाटपासाठी तांदूळ धारूर येथे गोदामात प्राप्त झाले असून येत्या दोन दिवसात वाटप करण्यात येणार आहे .
कोरोराच्या पाश्वभुमीवर गरिब व्यक्तींना तांदूळ वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे.यामध्ये धारूर तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत प्रधान्य कुटुंब शिधापत्रिका संख्या 19266 एवढी असून यामधील सदस्य संख्या 69088 एवढी आहे . तर अंत्योदय शिधापत्रिका संख्या 2936 आहे . त्यामधील 10 हजार 895 सदस्य संख्या आहे . दोन्ही योजनेतील प्रति सदस्य ( व्यक्ती) यांना 5 किलो प्रमाणे तांदूळ वितरित करण्यात येणार आहे.त्यासाठी धारूर तालुक्यास प्रधान्य कुटुंब तांदुळ 330.448 मे.टन व अंत्योदय तांदुळ 54.66 मे टन धान्य प्राप्त झाले आहे .
मंगळवारी सदर धान्य गोदामामध्ये प्राप्त झाले असून शहरात आजच उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुढील तीन दिवसात सर्व तालुक्यातील रास्त भाव दुकानावर पोहोच करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपले विनामूल्य धान्य नियमानुसार उचल करावे असे नायब तहसिलदार सुहास हजारे यांनी सांगितले.
---
Leave a comment