नगराध्यक्षांनी केलेल्या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
बीड । वार्ताहर
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणार्या गोरगरीब मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सूचनेवरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागानुसार लोकांची यादी दहा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करून अशा लोकांना तत्काळ धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी केली होती ती मंजूर झाली असे असून आता बीड शहरातील नागरिकांना रेशनवरील धान्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे
कोरोनाबीड शहरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद असून मोलमजुरी करणार्या आणि हातावर पोट असणार्या हजारो नागरिकांना या काळात शासनाच्या वतीने देण्यात येणारे धान्य रेशनकार्ड असणारे आणि रेशन कार्ड नसणारे अशा नागरिकांची प्रभाग निहाय यादी अद्यावत करून ही यादी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि तहसीलदार आंबेकर यांच्याकडे सुपूर्त केली होती त्यानुसार शहरातील अशा नागरिकांना आता स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य वाटप केले जाणार आहे. मध्यंतराच्या काळात काही चमकोगिरी करणार्या यांनी शहरातील लोकांना आपल्यामुळेच धान्य वाटप होणार असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला एवढेच नव्हे तर स्वस्त धान्य दुकान समोर जाऊन तिथेही फोटो सेशन करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. प्रत्यक्षात प्रभाग निहाय यादी दाखल करून त्यानुसार धान्य वाटप करण्याची मागणी अत्यंत रास्त असल्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्यात मंजुरी दिली आहे आता प्रत्येक प्रभागातील नागरिकांना हे धान्य वाटप मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
Leave a comment