आतापर्यंत 25 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातुन डिस्चार्ज

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना । वार्ताहर

जिल्ह्यात दि. 28 मे, 2020 रोजी 25 व्यक्तींचा स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त  झाला असुन आतापर्यंत 25 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णलयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जालना शहरातील ढोरपुरा परिसरातील व सध्या शासकीय मुलींचे निवासी वसतीगृह, जालना या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या तीन जणांच्या स्वॅबचा अहवाल, जालना शहरातील नुतन वसाहत परिसरातील व सध्या शासकीय मुलींचे  निवासी वसतीगृह मोतीबाग, जालना या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेलया तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल, मठपिंपळगाव ता. अंबड येथील व सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, अंबड या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल, काटखेडा ता. अंबड येथील व सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, अंबड या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल, मुंबईवरुन परतलेले व मुळचे अंबड शहरातील शारदानगर परिसरात राहणारे आणि सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, अंबड या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या पाच जणांच्या स्वॅबचा अहवाल, सामनगांव ता. जालना येथील एका 32 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल, बदनापुर येथील एका 33 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 3 येथील व सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या एका 42 वर्षीय जवानाच्या स्वॅबचा असे एकुण 25 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल दि. 28 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण 2274 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 71 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 1024 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 60 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2448 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -25 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -110 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2256, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -345, एकुण प्रलंबित नमुने -78 तर एकुण 953 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-08, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या- 843 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 29, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -410, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -71, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -25, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2568 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 410 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-21, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -42, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -128 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-24, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे -52, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-04, मॉडेल स्कुल मंठा-39, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-15 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 679 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 121 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 618 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 96हजार 830 असा एकुण 3 लाख 23  हजार 638 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.