भोकरदन । वार्ताहर
शहरातील स्वा. सावरकर प्रतिष्ठाण तर्ङ्गे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात व सोशल डिस्टन्स पाळून साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खा.रावसाहेब दानवे , भोकरदन जाङ्गराबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष दानवे , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश भाऊ चिने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वा. सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. खा. रावसाहेब दानवे यांनी यावेळी स्वा. सावरकर यांचे जीवनकार्य , त्यांनी देशासाठी केलेला त्याग , याविषयी विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष रितेश देशपांडे , विकास जाधव , मोहन शास्त्री , गजानन शास्त्री , महेश पुरोहित , अंकुश शास्त्री , मनोज लेकुरवाळे , विराम चिने , आदित्य चिने आदी उपस्थित होते.
Leave a comment