गेवराई । वार्ताहर
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे.या दरम्यान शहरी,ग्रामीण भागात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.मात्र गेवराई शहर याला अपवाद आहे.की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे आज भाजीपाला खरेदी करण्यासाठी नियमाची पायमल्ली करत तोबा गर्दी केली असल्याचे दिसुन आले आहे.
गेल्या 24 मार्च पासुन देशभरात लॉक डाऊन चे कडेकोड पालन करण्यात येत आहे.गेवराई येथे ही येथील उपजिल्हा रुग्णालयातील वाहना द्वारे डॉ.राजेश शिंदे डॉ.नोमानी सह सर्वच जण जिव तोडुन वेळोवेळी जनजागृती करुन नागरिकांना सोशल डिस्टेन्स ठेवुन घरी राहुन आरोग्याची काळजी घेण्याचे सुचना करत आहे.व नागरिकांनीही ते पाळले असल्याचे दिसुन आले होते.मात्र अचानक बुधवारच्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा गैर फायदा घेत सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान किराणा दुकान,भाजी मार्केट,बँक, दवाखाने, मेडिकल, पेट्रोल पंप समोर मोठी गर्दी जमल्याने एका प्रकारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे दिसुन आले आहे.
Leave a comment