वडवणी । वार्ताहर
संपुर्ण देशात कोरोणा जंतुसंसर्गआजाराचे दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून हैद्राबाद येथुन राजस्थानला निघालेले आठ मजुर वडवणी येथुन जात असल्याचे निदर्शनास आले आसता त्यांना वडवणी पोलिस प्रशासन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व तपासणी करून त्यांना वडवणी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय येथील विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्यात कसल्याही प्रकारे कोरोनाची लक्षणे दिसुन आले नाही आशी माहिती तलाठी कुचेकर जी ए यांनी दिली.
पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान येथील आठ मजुर हैद्राबादला गेले होते. या भयंकर रोगाला अटोक्यात आणण्यासाठी गेली पंधरा दिवस झाले शासनाने लॉकडाऊन केल्याने मोल मजुरी करून हातावर पोट असणार्या मजुरावर हाताला काम नसल्याने उपास मारीची वेळ आली. त्यामुळे सर्व रस्ते बंद झाल्याने पायी निघालेल्या आठ मजूरांनी आपल्या घराचा रस्ता धरला असून हैदराबाद येथून राजस्थानला निघालेल्याआठ मजुरांना वडवणी पोलिसांनी त्यांची चौकशी करून वडवणी येथील आरोग्य केंद्रात तपासणी करून त्या मजुरांना वडवणी येथील कस्तुरबा गांधी महाविद्यालयात येथे तयार करण्यात आलेल्या विलीनीकरण कक्षात ठेवण्यात ठेवून त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत.
Leave a comment