गेवराई । वार्ताहर
कोरोना साथ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा बाहेर अपडाऊन करणार्या सर्व अधिकारी कर्मचार्यांनी मुख्यालयी थांबावे असे सक्तीचे आदेश दिले आहे. तरी आदेशाचे पालन न करणार्यावर वाहनाचे पास रद्द करुन कार्यवाही करण्यात येईल असे नायबतहसिलदार प्रशांत जाधवर, पोलिस निरिक्षक पुरुषोतम चौबे यांनी सांगितले आहे.
कोरोना या साथ रोगाने जगभरात थैमान घातले आहे.हजारो नागरिकांचे या आजारामुळे बळी गेला आहे. देशामध्येही रुग्णांचा आकडा हजारोच्यावर गेला म्हणुन या साथ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने संपुर्ण पणे लॉक डाऊन केलेले आहे. तसेच बीड जिल्हाच्या शेजारील जिल्हा मध्ये कोरोना या साथ रोगाचे रुग्ण आढळुन आल्याने जिल्हातील सर्व सामान्य नागरिकांना या आजाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा बाहेरुन अपडाऊन करणार्या सर्व अधिकारी ,कर्मचार्यांना मुख्याल्यावर रहावे असे सक्तीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देत प्रतिबंध केले आहे.सदर आदेशाचे पालन न करणार्यावर वाहन पास रद्द करुन कार्यवाही करण्यात येईल असे नायबतहसिलदार प्रशांत जाधवर, पोलीस निरीक्षक पुरुषोतम चौबे यांनी सांगितले आहे.
Leave a comment