बदनापूर । वार्ताहर
कोरोना पार्शवभूमीवर शिवसेना युवा सेनेच्यावतीने बदनापूर येथील पत्रकारांना सिनेटायझरचे वाटप युवा सेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी वाटप केले. कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सिनेटायझर चा वापर नियमित करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून या रोगाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असतांना जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेना युवा सेना पुढे सरसावली असून जालना जिल्हा युवा सेनेच्या वतीने भाऊसाहेब घुगे यांनी बदनापूर तालुक्यातील पत्रकारांना सिनेटायझर चे वाटप केले. यावेळी बदनापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अकरमखान पठाण, सय्यद रङ्गिक अली, सय्यद नजाकत, शेख अजहर, रघुनाथ होळकरसह अनेक जण उपस्थित होते
Leave a comment