बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी माजलगाव तालुक्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ग्रामपंचायत स्तरावर साफसफाई, ग्रामस्थांमध्ये जनजागृती, सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणाची फवारणी अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच टाकरवण जि.प. सर्कल अंतर्गत असलेल्या बाराभाई तांडा ग्रामपंचायतकडून सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक फवारणी करत ग्रामस्थांना डेटॉल साबन वाटप करण्यात आले.जनतेला निव्वळ सूचना न करता ज्या जनतेने आपल्या पाठीवर मतदानरूपी आशिर्वादाचा हात ठेवला त्या जनतेचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी सरपंच किर्तीताई चव्हाण यांच्याकडून आपली ग्रामपंचायत निर्जंतुकीकरण करतांना दिसून आली. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना बाळगून सरपंच किर्तीताईंनी गावातील काही तरूणांनाच्या माध्यामातून संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी करून घेतली. तसेच यावेळी त्यांनी ग्रामस्थांना घरी जावून डेटॉल साबन व सिनेटाईझर देवून हात स्वच्छ धूण्यास सांगत कोरोना विषाणुशी लढा देण्याची संपूर्ण माहिती घरोघरी जावून ग्रामस्थांना दिली. यावेळी सरपंच त्यांच्यासोबत तलाठी प्रज्ञा गायकवाड, ग्रामसेवक राजेंद्र घमाट, अर्जुन पवार, प्रकाश चव्हाण, सुनिल चव्हाण, विष्णु चव्हाण, अर्जुन राठोड यांचा समावेश होता.ज्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत आपल्या पाठीवर मतदानरूपी आशिर्वादाचा हात ठेवला. त्या जनतेला संकटात एकटं सोडणं मला पटत नाही आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना बाळगून मी माझ्या गावची प्रथम नागरिक या नात्यांने संपूर्ण गाव सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी करत येथील नागरिकांना घरोघरी जावून स्वच्छतेचे साहित्य वाटप केले अशी माहिती सरपंच किर्तीताई चव्हाण यांनी दिली.
Leave a comment