जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना । वार्ताहर
मुंबई येथुन परतेले व मुळचे मठ पिंपळगाव ता. अंबड येथील रहिवाशी असलेला 11 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा या दोघांच्या स्वॅबचा, मुंबई येथुन परतलेले व मुळचे वखारी वडगाव ता. जालना येथील रहिवाशी असलेल्या 25 वर्षीय व 28 वर्षीय अशा दोन महिलांच्या स्वॅबचा तसेच हिवरा काबली ता. जाङ्ग्राबाद येथील 7 वर्षीय मुलाच्या अशा एकुण पाच जणांच्या स्वॅबचा अहवाल दि. 26 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण 2098 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 64 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 999 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 175 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2290 एवढी आहे.
दैनिक पॉझिटीव्ह नमुने -05 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 76 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2023, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 336, एकुण प्रलंबित नमुने -187 तर एकुण 935 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-12, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 830 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 59, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -351, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -64, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -55, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2427 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 351 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-27, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -42, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -24 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाङ्ग्राबाद-14, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाङ्ग्राबाद-44 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाङ्ग्राबाद -23, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-13, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 52, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-04, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-00,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-36 शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-15 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 661 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 118 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 617 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 94 हजार 930 असा एकुण 3 लाख 21 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment