अंबाजोगाई । वार्ताहर
मागील एक महिन्यांपासून काम नसल्याने अडचणीत आलेल्या मजुरांसाठी ्ज्ञानप्रबोधिनीने पुढाकार घेतला असुन आज मजुरांना जिवनावश्यक वस्तु,किराणाचे साहित्याचे वाटप  करण्यात आले.कोरोनाच्या विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग होरपळत असताना देश व राज्य लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व व्यवसाय बंद असुन विशेषतः मागील अनेक महिन्यांपासून वाळुचा तुटवडा व आता लॉकडाऊन यामुळे बांधकाम पुर्णपणे बंद आहेत.त्यामुळे याशी संबंधीत हातावर पोट भरणार्या मजुरांची परस्थिती हालाखीची झाली आहे. अशावेळी प्रसाददादा चिक्षे यांनी आपल्या ्ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून लाल नगर, क्रांती नगर,भट्ट गल्ली व धनगर गल्ली येथील मजुरांना जिवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले असुन,अजुनही अनेक मजुरांना मदतीची गरज असुन शासनाने व दानशुर नागरीकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.आज शहरात तीन हजारांहुन अधिक नोंदणीकृत बांधकाम मजुर आहेत मागील अनेक दिवसांपासून काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी दानशुर व्यक्ती व संस्थेनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी असे आवाहन पुत्रेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गजानन मुडेगावकर यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.