जालना । वार्ताहर
कोरोनामुळे उद्भवलेल्या भयावह परिस्थित रमजानचा पवित्र महिना शांततेत व एकदम साध्या पद्धतीत संपन्न हेात असतांना या दरम्यान मुस्लीम बांधवांनी घरात राहुन अल्लाहाची (ईश्वराची) प्रार्थना करून कोरोनापासून जगातील मानव जातीला प्रामुख्याने मुक्ती मिळावी म्हणून उपवासाच्यावेळी विशेष प्रार्थना केली. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना अनेक मदतीचे हात पुढे आले.
रमजान ईद साजरी करण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ड्रायङ्ग्रुटचे कीट अत्यंत गरजूंना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने शनिवार रोजी वाटण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राम सावंत, अरूण घडलिंग, जावेद अली आदींची उपस्थिती होती.
Leave a comment