परळी । वार्ताहर
कोरोना विषाणूचा वाढत चाललेला फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवर राबवत आसलेल्या उपाय योजनेसाठी महात्मा जोतिबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने दहा हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांच्याकडे पतसंस्थेचे अध्यक्ष बंडू अघाव व सचिव अलिशान काजी यांनी सुपूर्द केला आहे. संपूर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याचा वरचेवर होत असलेला फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करून देशातील व राज्यातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाय योजना राबवत आहे. यासाठी खूप मोठ्या आर्थिक निधीची गरज आहे. यासाठी मराठवाडा शिक्षक संघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत निधी जमा करून साह्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद देत पतसंस्थेचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जोपसत पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दहा हजार रुपयांच्या धनादेश तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्या कडे पतसंस्थेचे अध्यक्ष बंडू अघाव, सचिव अलिशान काजी, व्यवस्थापक रमेश देशमुख यांनी सुपूर्द केला आहे.
Leave a comment