वरिष्ठ अधिकारी स्वस्त धान्य दुकानदारांचे संगनमत,तक्रारीनंतरही न्याय मिळत नसल्याची नागरीकांची खंत
केज । वार्ताहर
केज तालुक्यातील विडा जि.प.गटातील गावे ही दूर्गम व डोंगराळ भागात आसल्याने येथिल लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून येथिल बहुतांश लोक हे आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटक अथवा इतर ठीकाणी जाऊन आपली उपजीविका भागवत आहेत.माञ याच दूर्गम भागातील लोकांच्या वाटेला येणारे राशन केजच्या पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आशिर्वादाने काळ्याबाजारात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सोमवारी बीड जिल्ह्यातील काही इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या--- प्रतिनिधींनी विडा जि.प.गटातील गौरवाडी,कोरडेवाडी येथिल लोकांच्या भेटी घेऊन रेशनसंदर्भात विचारणा केली.यावेळी गौरवाडी येथिल स्वस्त धान्य दूकानदार सहा-सात महिने रेशनच आणत नसून,राशन काय आहे हे अद्यापपर्यंत आम्हाला माहित नसून,आम्ही ऊसतोडणी गेल्यावर आमच्या घरच्या वयस्कर लोकांचा आंगठा घेऊण दुकानदारच माल लाटत आहे.तसेच आम्ही या संदर्भात तहसिलदारांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या माञ त्यांनी कसलीच दखल घेतलेली नाही.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी तरी आमच्या हक्काचा घास मिळवून द्यावा अशी भावनीक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.तर कोरडेवाडी येथिल स्वस्त धान्य दुकानदार कुटुंबातील सर्व व्यक्तींचा माल देत नसून आर्ध्याच व्यक्तींचा माल देत आहे.तसेच धान्याचे माप करून न देता शेराने मापून देत असल्याची प्रतिक्रिया येथिल लोकांनी माध्यमांना दिली आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच लक्ष घालून गोरगरीबांच्या ताटातला अन्नाचा घास खाणार्या पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह स्वस्त धान्य दूकानदाराला धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे.धान्य दुकानाची चौकशी होणार-तहसीलदारयाबाबत तहसीलदार दुल्हाजी मेंडके म्हणाले, गौरवाडी येथिल लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.जिल्हाधिकारी साहेब न्याय द्या! जिल्हाधिकारी साहेब, आम्ही तहसिलदारांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या माञ त्यांनी आमच्या तक्रारींकडे कायमच दूर्लक्ष केले आहे.आत्ता तुम्हीच आमच्या हक्काचा घास आम्हाला मिळवून द्या अशी भावनिक साद लोकांनी जिल्हाधिकारी यांना घातली आहे.--------
Leave a comment