मंठा । वार्ताहर
मंठा तहसील कार्यालयात निवडणूक विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले गणेश खराबे यांनी सहशिक्षक शंकर हातागळे यांना दि 18 रोजी सकाळी 11:44 वाजता भ्रमणध्वनी वरून अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. व अशोभनीय भाषेत शिविगाळ करून तु शिक्षक आहे का मास्तर, थांब तुला दाखवतो. कुठ आहेस तु, दहा मिनिटात येतो, शेजार्याचे नियोजन बघून किराणा भरतो का तुड, ही आरपार ची लढाई आहे, तुझा सोक्षमोक्ष लावतो, एक तर तु जिवंत राहशील नाहीतर मी जिवंत राहील. याप्रमाणे जिवे मारण्याची धमकी दिली. याअगोदर सुद्धा बर्याच शिक्षकांवर असा प्रसंग ओढवला आहे.
अशी भाषा एका शिक्षकाला अशोभनीय आहे. अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.गणेश खराबे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवगाव खवणे येथे प्राथमिक पदवीधर या पदावर कार्यरत आहेत. मागील काही वर्षांपासून ते प्रतिनियुक्तीवर तहसील कार्यालयात काम करत असून ते एका शिक्षक संघटनेचे तालुका नेते आहेत. त्यांनी त्या पदावर काम करतांना शिक्षकांची बाजू सांभाळायला हवी अशी अपेक्षा शिक्षक वर्गात होती तीचा भंग झाला आहे.
Leave a comment