तिर्थपुरी । वार्ताहर
अंबड तालुक्यातील दह्याळा येथील पाणीपुरवठ्याच्या विहीर खोत कामासाठी मजूर कामगारा वस्तीवर दहा ते अकरा दरोडेखोरांनी दि.22 5 2020 रोजी मध्यरात्री मजूर कामगार व महिला वर लाकडी दंडुक्याने मारहाण करून महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी कळविली होती.
या दरोडाप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले असतानाही या दरोडाप्रकरणी गोंदी पोलिसांना आरोपी गुन्हेगाराच धागेदोरे अजून पर्यंत काहीच हाती न लागल्यामुळे तपासात काहीच प्रगती झाली नाही तसेच या दरोडाप्रकरणी शेतात राहणार्या वस्त्या गोठे या लोकात दरोडेखोरांच्या दहशतीमुळे रस्त्यावरील लोक गावांमध्ये राहण्यास आले असून लोकात एकच घबराट निर्माण झाली आहे तसेच या दरोडाप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड तपास यांच्याकडे असून तपासात या दरोड्याचे आरोपी मिळून येत नसल्यामुळे तसेच या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर या पथकाकडे हा तपास देण्यात यावा अशी मागणी लोकांमधून केली जात आहे या दरोडा प्रकरणी मारहाण झालेल्या जखमी महिला सुरेखा शिंदे निधन झाल्यामुळे पोलिसांनी तपासात जलद गतीने चक्रे फिरवून दरोडेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शिंदे कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे तरी पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
Leave a comment