भोकरदन । वार्ताहर
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना या पक्षाच्या भोकरदन तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील युवा नेते दिपक वेलदोडे यांची नुकतीच पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास गंगातीवरे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी तालुका उपाध्यक्ष म्हणून विनोद राऊत यांचीही निवड करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की,आपल्या आंबेडकरी चळवळीतील फुले, शाहू, आंबेडकरांच्या परिवर्तन वादी विचाराच्या कार्याला पाहून आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासमाज कार्याला गती देण्यासाठीआपण करीत असलेले कार्य पाहून आपली निवड करण्यात येत असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. यापुढे आपणरिपब्लिकन सेनेचे काम तळागाळातीलदलित, शोषित, बहुजनसमाजात पोहचवून पक्षाचे ध्येय धोरण आंदोलनात्मक चळवळी द्वारे पोहचवून कार्यकरावे व समाजाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन ही केले आहे. निवडी बद्दल दिपक वेलदोडे व विनोद राऊत यांचे लिंबाजी वाहुलकर, दादाराव लहाने, रोहिदास गंगातीवरे, विशाल मिसाळ, किशोर खिल्लारे, सोमनाथ सोनवणे, विजय राऊत,नितीन जोगदंड, विजय साळवे यांच्यासह सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment