तिर्थपुरी । वार्ताहर
अंबड तालुक्यातील दह्याळा येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीच्या खोत कामासाठी आलेल्या मजूर कामगार वस्ती वर दि.22 मे 2020 रोजी मध्यरात्री अचानक दहा ते अकरा दरोडेखोरांनी कामगार मजूर महिलावर अचानक हल्ला करुन मारहाण केली होती त्यापैकी एका विवाहित महिला सुरेखा शिंदे वय चोवीस वर्षे डोक्याला जबर मारहाण केल्यामुळे त्या महिलेला औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 23 5 20 रोजी दाखल केले होते पण उपचार सुरू असताना काल शनिवार रोजी रात्री दहा वाजता सुरेखा शिंदेचे अखेर निधन झाले.
तसेच अंतरवाली टेंभी तालुका घनसावंगी व गंगा चिंचोली तालुका अंबड येथील मजूर वडार समाज लॉक डाऊनमध्ये कामे नसल्यामुळे ते मजूर पोट भरण्यासाठी दह्याळा येथे विहिरीच्या कामासाठी आले होते या सुरेखा शिंदेच्या निधन होताच चिंचोली गावातील समाजामध्ये एकच शोककळा पसरली असून चोवीस तास उलटून गेले तरी गोंदी पोलिसांनी मात्र दरोडेखोरांना अजून पर्यंत अटक केली नाही तसेच आज दि 24 रोजी सुरेखा शिंदे सात वाजता गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Leave a comment