दरोडेखोरांच्या मारहाणीमुळे एका महिलेला औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले
तिथपुरी । सर्जेराव गिरे
अंबड तालुक्यातील दहयाळा येथे विहीरीच्या काम करणार्या मजुरांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून मजुरांकडील दागिने, पैसे लुटून या घटनेत महिला गंभिरीत्या जखमी झाले आहे. चंदनापुरी खुर्द येथील गावाच्या पाणी पुरवठयाच्या विहीरीचे दहयाळा शिवारात काम सुरू असुन या विहीरीच्या कामावर घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील मजूर कामाला होते दिनांक22रोजी पहाटे तिन वाजेच्या सुमारास अज्ञात 10 ते 11 दरोडेखोरांनी गंगाराम पांडु शिंदे, गंगाराम रामा शिंदे,सुरेखा साहेबराव शिंदे , रेखाबाई राजु शिंदे, अणिता सुभाष शिंदे, सुभाष गंगाराम शिंदे, संतोष गंगाराम शिंदे, हे गंभीर जखमी असुन त्यात सुरेखा शिंदे हि महिला अति गंभिरीत्या जखमी असुन संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यासह 16 जण कामासाठी वास्तव्यास होते काल रात्री हे मजुर झोपलेले असतानाच दरोडेखोरांनी लाकडे ,दगडांनी या मजुरांना हल्ला चढवला हल्ला सुरू असताना काही मजुरांनी शेजारच्या उसाच्या पळ काढला तर काहीं.हल्ल्यात किरकोळ जखमी आहेत. या दरोडयात नगदी ऐवज 30ते 40हजार रुपये तसेच महिलांच्या गळयातील मणीमंगळसुत्रे, नाकातील, पायातील दागिने जवळपास दिड ते दोन तोळे सोने लुटून नेले तसेच मजुरांकडील पुर्ण मोबाईल फोन ही फोडले. घटनास्थळावरुन दह्याळा गाव दोन किलोमीटरवर असल्याने तसेच मजुराचे मोबाईल फोडल्याने यातील काही मजुरांनी जवळच असलेले चुर्मापूरी गावात असलेल्या पाहुण्यांकडून जावुन संबंधित गूत्तेदाराला फोन लावुन सगळा घटनाक्रम सांगितल्यावर गूत्तेदाराने हि माहिती गोंदी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी दाखल परंतु दरोडेखोर मात्र सापडले नाही.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांची भेट
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंपालाल शेवगण तसेच जालना पोलीस दलाची लीली स्वान पथक पाचारण करण्यात आले होते पण घटना सही दरोडेखोराची सापडलेली चप्पल लीली वास घेऊन पण कोणताही माग सुगावा माग लागला नाही घटनास्थळी स्थानिक राजेंद्र सिंग गौर पीएस राजपूत रज्जाक शेख पोलीस कॉन्स्टेबल जामवाल कांबळे संजय मगर प्रशांत देशमुख सोमनाथ उबाळे कृष्णा संगे चौधरी रंजीत वै वैराळ विलास च के आधी सह पथकाने भेट दिली व दरोडेखोरांचा तपासाची चक्रे फिरविली तसेच ही घटना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप जोगदंड तसेच शहागड पोलीस चौकी बोंडले घटनास्थळी तातडीने दाखल झाली होती या दरोडेखोरांच्या विरुद्ध अज्ञात भादवि कलम 395 397 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास रत्नदीप जोगदंड करीत आहे.
Leave a comment