बीड / वार्ताहर
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एक संशयीत कोरोना बाधित असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाल्यानंतर आता पिंपळा व परिसरातील गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत दरम्यान या परिसरातील एकूण 879 घरांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा गावापासून आजूबाजूच्या तीन किलोमीटरवरील सूंबेवाडी, धनगरवाडी ,काकडवाडी, खरडगव्हाण हा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पिंपळा परिसरातील 879 घरांचे सर्वेक्षण आरोग्य पथकामार्फत केले जाईल. दररोज शंभर घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये ताप,सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले जाणार आहे तसेच गरज पडल्यास सात कि.मी. परिसरातील गावांमध्ये देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.आरोग्य पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, 20 आरोग्य कर्मचारी, एक शिक्षक यांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली.
Leave a comment