कडा । वार्ताहर

प्रशासन आणि जनता यातील मुख्य दुवा म्हणून ओळखले जाणारे ग्रामसेवक हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गाव, खेडी, वस्ती, वाडी, सुरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती सोबतच नोंदणी,सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आष्टी तालुक्यात 125 ग्रामपंचायती असुन 78 ग्रामसेवक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गावे सुरक्षित राहावीत यासाठी फक्त जनजागृती न करता बाहेरून आलेले नातेवाईक, पाहुणे, स्थानिक नागरिक यांची चौकशी करून नोंद करून घेणे, ग्रामपंचायती अंतर्गत गाव वस्ती, वाडीत जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप,पाणीपुरवठा शुद्धीकरण करून सुरळीत करणे, सोडियम हायपोक्लोराईड ,हात धुण्यासाठी डेटॉल साबणाचे वाटप करणे,लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे.यासह घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे.तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक हे कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सुरक्षा कवच असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने जिव धोक्यात घालणार्या ग्रामसेवक यांचा देखील विमा कवचसाठी विचार करणे गरजेचे असल्याचे धामणगांव येथील ग्रामसेवक गोवर्धन गिरी यांनी सांगितले.
-----------

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.