तळणी । वार्ताहर
मंठा तालुक्यातील तळणी व परीसरात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाथ्याना मानधन वाटप. रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नाही. शेतकर्यासाठी कापुस खरेदी केंद्र सुरू नाही .फळबाग व भाजीपाला उत्पादन शेतकर्यांना मदत नाही. बांधकाम कामगारांना हक्काचे अनुदान नाही नाभिक बांधव व गटई कामगार लॉकडाऊन काळात वार्यावर हातावर पोट असणार्या लहाण व्यावसायिक हमाल मापाडी यांना कोणतीही आर्थिक मदत नाही .कोरोणा प्रादुर्भाव काळात डॉक्टर नर्स पोलीस स्वच्छता कर्मचारी यांना आरोग्य सुविधा नाही .गरजुना रेशन कार्ड वाटप नाही.
विलगीकरण कक्षात स्थलातरीताना कोणतीही सुविधा नाही .नोंदणीकृत कापुस उत्पादन शेतकर्यांना अनुदान नाही. विकास कामांना स्थगिती. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन 7ड़12 कोरा करू म्हणत शेतकर्यांचा विश्वासघात. साधुसंताच्या महाराष्ट्रात साधुसंताची निर्घुण हत्या .कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यास असमर्थ. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला लक्षांकाची अट .मराठवाड्यासाठी वरदान ठरणार्या मराठवाडा वॉटर ग्रीड स्थगिती. स्थलातरीताना गावी परत येणार्यासाठी मोफत बसेसची व्यवस्था नाही. लॉकडाऊन काळात लहान मोठ्या व्यावसायिक दुकानांची विज बिल माफ नाही. शेतकर्यांना कर्जपुरवठा नाही .महिला बचत गटांना कर्जमापी नाही. महाराष्ट्र बचाव कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा .यावेळी निषेधकर्ते गजानन देशमुख. दारासिंग चव्हाण. नितिन सरकटे. शिवदास हनवते. केशव येऊल. शरद सरकटे .किशोर हनवते .कुंडलिक वाकळे. सुभाष राठोड. रसुल आत्तार .शिध्देश्वर सरकटे .शिवाजी सरकटे .गोविंद भावसार. यंशवत सोनुने .शिवनारायण सोनुने .शशिकांत सरकटे. बालु सरकटे. विलास भारस्कर .सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी तळणी परिसर
Leave a comment