वडवणी । वार्ताहर
वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील ग्रामपंचायतने प्रशासनाने नेमून दिलेल्या अंमलबजावणीचे काटेकोरपणे पालन करत आहे. गावांमधील स्वच्छता. सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. तरी गावतील सर्व जनतेने येत्या काही दिवसासाठी घरातच धांबुन सहकार्य करण्याची विनंती गावचे कर्तव्यदक्ष युवा सरपंच अॅॅड.माधव शेंडगे यांनी केले आहे.
देशामध्ये संसर्गजन्य कोरोनाव्हायरस प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्याला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील परडी माटेगाव येथील ग्रामपंचायतने कोरोनाव्हायरस रोगाला रोखण्यासाठी प्रशासनाला दिलेल्या अटी व नियम काटेकोरपणे पालन करत संपुर्ण गावातील नाली सफाई करणे.सोडियम हायपो क्लोराईड ची फवारणी करण्यात आली आहे. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची आरोग्य विभागाकडुन तपासणी करून त्यांच्या राहण्याची स्वतंत्र सोय करणे व त्यांना लागणारे साहित्य पुरवणे गावामध्ये युवकांची फौज तयार केली आहे. त्यांना ग्राम पचायत तरफे आय कार्ड ही देण्यात आले आहे. यामध्ये, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विस्तार अधिकारी, सरपंच ऊपसरपंच मा सरपंच सर्व जन गावातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी चौक बंदोबस्त करत आहेत. तरी गावतील सर्व जनतेने येत्या काही दिवसासाठी घरातच धांबुन सहकार्य करण्याची विनंती गावचे युवा सरपंच अॅड.माधवराव शेंडगे यांनी केले आहे.
Leave a comment