अंबाजोगाई पिपल्स बँकेस दोन कोटींचा नफा-मोदी

अंबाजोगाई । वार्ताहर
मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात नांवारूपास आलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेकडे 31 मार्च 2020 अखेर सुमारे 397 कोटी 64 लाख रूपयांच्या ठेवी आणि बँकेस 2 कोटी 11 लाखांचा रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या मुख्य कार्यालय, 2 विस्तारीत कक्ष यासह 16 शाखांचा विस्तार झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

बँकेच्या वतीनेे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राजकिशोर मोदी यांनी म्हटले आहे की, सहकार क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावता येते.सामाजिक बांधिलकी मानुन ही बँक काम करीत आहे.याच उद्देशाने आमचे श्रद्धास्थान असणारे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख व दिवंगत नेेते माजी आ.बाबुराव आडसकर यांनी त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे अंबाजोगाई पिपल्स बँक आज खर्या अर्थाने प्रगतीकडे झेपावते आहे.1996 साली लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. या बँकेेच्या सर्व शाखा व मुख्य कार्यालय संपुर्णपणे संगणकीकृत असून रूपे एटीएम कार्ड सुविधा,तात्काळ सोने तारण कर्ज,ठेवीवर ठेव वीमा योजने अंतर्गत विमा संरक्षण,जेष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते.वाहन कर्ज,गृह,वैयक्तिक, लघुउद्योग व औद्योगिक कर्ज देण्यात येते.सेफ डिपॉझिट लॉकर्स,आरटीजीएस, एनईएफटी,बँकेच्या सर्व शाखेतील ग्राहकांना एसएमएस बँकिँग सुविधा यासहित विविध ठेव योजना बँकेच्या सुरू आहेत.ग्राहक हेच आपले दैवत मानुन तत्पर व विनम्र सेवा प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीने केला जात आहे.31 मार्च 2020 अखेर बँकेची सभासद संख्या-10985 एवढी आहे. बँकेकडे 397 कोटी 64 लाख रूपयांच्या ठेवी आहेत.बँकेने 203 कोटी 6 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.बँकेकडे 11 कोटी 8 लाखांचे वसुल भागभांडवल असून 27 कोटी 79 लाख रूपयांचा स्वनिधी आहे.बँकेने 208 कोटी रूपयांची गुंतवणूकही केली आहे.बँकेस 31 मार्च 2020 अखेर 2 कोटी 11 लाख रूपयांचा नफा झाला आहे.बँकेने दुष्काळी परिस्थिती असताना व कोरोना विषाणु साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर कर्ज वसुलीत सातत्यपूर्ण प्रयत्न करून बँकेचा नेट एनपीए 7.61 एवढा ठेवण्यात बँकेला यश आले आहे.तरी ही पुढील काळात बँकेचा एनपीए कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करू अशी माहिती चेअरमन राजकिशोर मोदी यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.